Thursday, June 25, 2009

अखेरचे चित्र...

ज्याच्या कुंचल्यातून प्रकटली चित्रे हो बहूविधनेक
ऐसा थोर आणि जगप्रसिद्ध असे तो चित्रकार एक
एके दिनी त्या चित्रकारा वाटे काढावे चित्र ऐसे एक
निरागसता आणिक निष्पाप मनाचे व्हावे ते प्रतीक

गावागावातून फिरून बघितल्या शाळा त्याने अनेक
त्यातूनी मग शेवटी निवडला मुलगा निरागस एक
काढीले मग चित्र त्याचे त्याने करुनी दिवसरात्र एक
पाहता पाहता चित्र ते गेले ओलांडून सीमा अनेक

मास सरले सरली कितीक वर्षे चित्रकार वृद्ध जाहला
क्रौर्याचे चित्र काढण्याचा ध्यास त्याने मनी घेतला
तुरूंगामागून तुरूंग पाहीले त्यातून कैदी एक निवडला
दाढी मिशा अन भयाण डोळे असा तो कैदी रेखाटीला

चित्राची त्या प्रत घेऊनी हाती मग कैदी ढसढसा रडला
फारा वर्षापूर्वी काढीले चित्र ज्या मुलाचे मीच तो बोलला

- अतुल (२ जून २००९)

1 comment:

Anonymous said...

Excellent touching :-)