Tuesday, May 5, 2009

पुनर्भेट...

शाळेच्या जीवनात असती ते तिघे मित्र खास
तिघे मिळूनी करीत असती मौज मजा अभ्यास
एकच सारे असे हो त्यांचे बस्स वेगळे नावास
एक पार्थ दूसरा नील अन तिसरा असे राजस

संपता शाळेची वर्षे उजाडला निरोपाचा तो दिस
भेटूया वीस वर्षानी पुन्हा इथे तिघानी ठरविले खास
काळ गेला दिन सरले सरले एका मागोमाग मास
उगवला दिन पुनर्भेटीचा वर्षानी एक दोन नव्हे वीस

मैदानावर संध्या समयी दिसला पार्थासी राजस
पण राजस मूकपणे निघूनी गेला करूनी गूढ हास्य
नंतर येता नील, पार्थ सांगे "गेला येऊनी राजस"
"राजस जग सोडूनी झाली वर्षे" बोले नील उदास

थिजले दोघे स्तंभित वारे स्तब्ध स्तब्ध उच्छवास
आकाशी चमकत होता परी कुणी तारा एक खास

-अतुल

1 comment:

साळसूद पाचोळा said...

"राजस जग सोडूनी झाली वर्षे" बोले नील उदास
.
.
पुनर्भेट..."
.
...मनाला भिडलि... अति उत्तम .. keep it up...