Monday, March 9, 2009

Little Match Girl



एक पोर ती थकलेली दमलेली अन झालेली पूरती क्षीण
"घेता का उदबत्ती काका" विनवी केविलवाणी ती दीन

खूप हिंडली खूप ती फिरली, कुणी ना तिची उदबत्ती खरीदली
घरी धाक सावत्र आईचा, धाकाने ना ती घरीही फिरकली

जोश ना उरला त्राण न उरले, वेळेचेही भान न ऊरले
झाली संध्या अंधार पडला, पक्षी ही घरट्याकडे फिरले

एकटी भूकेली गरीब ती बिचारी, अन्नासाठी वणवण फिरली
वाडे इमले अन माड्या त्या शहरी, परी कुणी न तिची दखल घेतली



रात्री अपरात्रीचा तो प्रसंग बाका, अन थंडीचाही वाढला कडाका
शोधिता आसरा भटकता भटकता, बंगल्यापाशी ती आली एका

टाचा उंचाऊन खिडकीतून दिसले, काचे पलीकडे मिष्टान्न सजले
करी आटापिटा जंग जंग पछाडले, हतबल वेडी हात पाय थकले

छातीशी मग हात बांधूनी, अन पोटाशी पाय घट्ट दुमडूनी
थंडीची ना मग तमा बाळगूनी, बसले कारुण्य आशा धरूनी



काळ पाऊली रात्र सरु लागली, थंडी कडाडून जोर धरू लागली
दूर कोठेतरी उल्का पडून गेली, भुकेल्या बाळीला ग्लानी आली

कष्टाने मग एक उदबत्ती पेटविता, अवचित एक चमत्कार झाला
घेऊनी खाऊ आणि खेळणी तिला, आज्जी आली भेटाया नातीला



आज्जी आज्जी तू कुठे ग होतीस, म्हणे तू तर ह्या जगातच नव्हतीस
लहाणपणी किती हट्ट पुरवायचीस, सोडून मला मग गेली कुठे होतीस

ओढूनी जवळ तिचे पापे घेतले, अन कुरवाळूनी तीज मग आज्जी बोले
का ग राणी तुझे डोळे असे ओले, चल मी तर तुला न्यायलाच आले



खूप खाल्ले अन खूप ती खेळली, आज्जी सवे मग दूर दूर निघाली
सकाळी जेंव्हा सुर्य किरणे आली, निष्प्राण तिच्या देहावर पडली

मातीत ते कोवळे हात पसरलेले, केले वरी उदर भूकेने व्याकूळलेले
संपले भूक-श्रम संपले आता सगळे, निस्चेष्ट पहूडले पार्थीव थकलेले

पांथस्थ थबकती हळहळून जाती, गहिवरती पाहूनी तो देह जीवहीन
परी कुणा न ठावे किती खुष ती, खेळता आज्जीसंगे तल्लीन

परी कुणा न ठावे किती खुष ती, खेळता आज्जीसंगे तल्लीन

(Hans Christian Andersen यांच्या The Little Match Girl ह्या कथेवरून)

3 comments:

Prag said...

Atul.........
chan lihile aahes........
vichar karayla lavnari......
best...
apratim...

चैताली आहेर. said...

काटा आला अंगावर....

पुन्हा कथा अनुभवली....!!

Anonymous said...

ahha! kharch kata aala angavr!!!.......